श्री ष ब्र १०८ वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज मुर्ती स्थापना कलशारोहण सोहळा बेंद्री ता नायगाव जिल्हा नांदेड दिनांक २०/२/२०२६ रोज शुक्रवार १२, १५ मिनिटानी या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही विनंती🙏🙏🙏🙏🙏🙏विनित🙏🙏 ओम नमः शिवाय जप मंडळ समस्त गावकरी मंडळी बेंद्री 💐💐💐💐स्थळ,,, श्री ष ब्र १०८ वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज चरणस्थळ पादुका मंदिर बेंद्री🌷🌷🌷🌷🌷🌷🌷आज पासुन निमंत्रण सांगण्यास सुरुवात जय गुरुदेव ओम नमः शिवाय
-
Next
जय शिवा प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही श्री क्षेत्र कपिलधार ता.जि. बीड येथे कार्तिक शुध्द्ध पोर्णिमा निमित्त होत असलेल्या २४ शासकीय महापुजा व शिवा संघटनेच्या ३० व्या राज्यव्यापी मेळाव्यानिमित्त होणाऱ्या भव्य कार्यक्रमाची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात /वृत्तवाहिनीवर प्रकाशित करून सहकार्य करावे ही नम्र विनंती.आपला नम्रप्रा. मनोहर धोंडे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, शिवा संघटनाप्रेस नोट’मान्यवरांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र कपिलधार येथे शिवा संघटनेच्या ३० व्या राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन’ ‘श्री क्षेत्र कपिलधार येथे ५ नोव्हेंबरला शासकीय महापुजा व शिवा मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजितदादा सह मान्यवर उपस्थित राहणार ‘ -प्रा. मनोहर धोंडे(प्रतिनिधी दि.३०) :- शिवा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत युवक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी कार्तिक शुध्द पौर्णिमेच्या निमित्त श्री क्षेत्र कपिलधार, ता. जि. बीड येथे होणाऱ्या यात्रेमध्ये ‘शासकीय महापुजा’ व ‘भव्य राज्यव्यापी वार्षिक मेळावा’ आयोजित केला जातो. सन १९९६ पासुन राज्यव्यापी मेळावा आणि सन २००२ पासुन श्री क्षेत्र कपिलधार येथील संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या संजिवन समाधिची शासकीय महापुजा बीडचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, धर्मगुरु व शिवा संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते दुपारी ४.०० वाजता करण्याची परंपरा असुन मागील २५ वर्षापासुन शासकीय महापुजा तर मागील ३० वर्षापासुन शिवा संघटनेचा राज्यव्यापी मेळावा आयोजित केला जातो. त्यामुळे यंदाही दि. ०५ नोव्हेबर २०२५ रोज बुधवारी दुपारी ठिक ४.०० वाजता २४ वी शासकीय महापुजा आणि शिवा संघटनेचा ३० वा राज्यव्यापी वार्षिक मेळावा आयोजीत केला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शिवा संघटनेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील लिंगायत समाजाच्या मान्यवरांना ‘शिवा राष्ट्रीय भुषण पुरस्कार’ जाहिर करुन, सन्मान चिन्ह व सन्मान पत्रासह मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ देवुन यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. देशातील वीरशैव लिंगायत समाजात अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या शिवा संघटनेच्या या मेळाव्यासाठी आणि शासकीय महापुजेसाठी पालकमंत्री तथा उप मुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार, मा. ना. पंकजाताई मुंडे, मा. ना. अतुल सावे, माजी मंत्री मा. आ. धनंजय भाऊ मुंडे, माजी विरोधी पक्ष नेते मा. आ. विजयभाऊ वडेट्टीवार, शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे व अनेक गुरुवर्य यांच्यासह शिवा संघटनेचे राष्ट्रीय व राज्य पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत.शिवा- अखिल भारतीय वीरशैव लिंगायत युवक संघटनेच्या वतीने सन १९९६ पासुन म्हणजेच शिवा संघटनेच्या स्थापनेपासून प्रतिवर्षी कार्तिक शुध्द पोर्णिमेच्या दिवशी वीरशैव लिंगायत समाजाचे श्रध्दास्थान असलेले श्रीक्षेत्र कपिलधार ता. जि. बीड येथे शिवा संघटनेचा राज्यव्यापी वार्षिक मेळावा आयोजित केला जातो. त्यानिमीत्ताने सुमारे ५ ते ६ लाख वीरशैव लिंगायत समाज बांधव दर्शनासाठी व शिवा संघटनेच्या राज्यव्यापी मेळाव्यासाठी पायी दिंड्या आणि वाहन रॅलीच्या माध्यमातुन उपस्थित होत असतात.शिवा संघटनेच्या मागणीनुसार पंढरपुर प्रमाणेच श्रीक्षेत्र कपिलधार ता. जि. बीड येथे लिंगायत संत, श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या संजिवन समाधीची प्रतिवर्षी कार्तिक शुध्द पोर्णिमेच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र शासनाकडून शासकीय महापुजा सन २००२ पासुन करण्यात येत आहे. सदरची महापुजा शिवा संघटनेच्या मागणीनुसार व लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे यांच्या आग्रहावरुन तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांनी सन २००२ पासुन सुरुवात केली आहे. त्यानुसार तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. आर आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०६ सप्टेंबर २००७ आणि दि. १४ मार्च २००८ रोजी मंत्रालयात शिवा संघटनेच्या सोबत संपन्न झालेल्या बैठकीत श्री क्षेत्र कपिलधार ता. जि.बीड येथे प्रतिवर्षी कार्तिक शुध्द पौर्णिमेनिमीत्त होणाऱ्या यात्रेत कार्तिक शुध्द पोर्णिमेच्या दिवशी दुपारी ठिक ४.०० वाजता महाराष्ट्र शासनाच्या वतीने मा. मुख्यमंत्री किंवा किमान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी शासकीय महापुजा करावी असे ठरले आहे. त्यानुसार यंदाही संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या संजिवन समाधिची शासकीय महापुजा करण्यासाठी मा. मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री व इतर मंत्री महोदयासह मान्यवरांना निमंत्रण दिलेले आहे.त्यानुसार यंदाच्या २४ व्या शासकीय महापुजेसाठी व शिवा संघटनेच्या ३० व्या राज्यव्यापी मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री तथा उप मुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार, मा. ना. पंकजाताई मुंडे, मा. ना. अतुल सावे, माजी मंत्री मा. आ. धनंजय भाऊ मुंडे, माजी विरोधी पक्ष नेते मा. आ. विजयभाऊ वडेट्टीवार, शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे व अनेक गुरुवर्य यांच्यासह शिवा संघटनेचे राष्ट्रीय व राज्य पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत.त्यामुळे प्रति वर्षा प्रमाणे यंदाही श्री क्षेत्र कपिलधार ता. जि. बीड येथे यावर्षीचा शिवा संघटनेचा ३० वा राज्यव्यापी मेळावा व २४ वी शासकीय महापुजा दि. ५ नोव्हेबर २०२५ रोज बुधवारी दुपारी ठिक ४.०० वाजता संपन्न होणार असल्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील शिवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वीरशैव लिंगायत समाज बाधव आणि बहुजन समाज बांधवानी ढोल ताश्याच्या गजरात जय शिवाचा नारा देत हजारोंच्या संख्येने श्री क्षेत्र कपिलधार येथे उपस्थित रहावे असे आवाहान शिवा संघटनेचे वतीने करण्यात येत आहेअसे शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माहिती दिली आहे.हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे शिवराज भोस्कर शिवा संघटना शाखा नायगाव उपाध्यक्ष 🙏🙏🙏🙏


