रुद्राक्ष #एकमुखीरुद्राक्ष
शिवभक्तांपैकी प्रत्येकाला ज्याचं प्रचंड आकर्षण आहे असा एकमेवाद्वितीय रुद्राक्ष म्हणजे “एकमुखी रुद्राक्ष”, एकमुखी रुद्राक्ष हा शिवभक्तांचा प्राण समजला जातो. प्रत्येक श्रध्दावान शिवभक्तांकडे एकमुखी रुद्राक्ष असावा असं त्यांना मनापासून वाटतं. अस्सल नेपाळी एकमुखी रुद्राक्ष हा प्रचंड दुर्मिळ असल्याने व जवळपास अप्राप्य असल्याने त्याला पर्याय म्हणून पण तितकाच प्रभावी असा इंडोनेशियन रुद्राक्ष प्रचलित आहे. नेपाळी एकमुखी रुद्राक्ष हा मध्यम आकाराचा, गोल व अतिशय सुबक असतो. त्याचे दर्शनही दुर्मिळ असते. पशुपतीनाथ मंदीरात अस्सल नेपाळी एकमुखी रुद्राक्ष पूजेत आहे. सध्या रुद्राक्षांमधील डुप्लिकेशन, लबाड्या यांचा विचार करता मी स्वत: कुणालाही नेपाळी एकमुखी रुद्राक्षांच्या हट्टापासून परावृत्त करतो. तिनमुखी गोल रुद्राक्ष घेऊन अत्यंत सफाईदारपणे त्याची दोन मुखे बुजवून त्यांना एकमुखी म्हणून बाजारात आणण्याचे प्रकार केले जातात. एकमुखी रुद्राक्षावर क्वचितप्रसंगी शिवलिंग, नंदी, ॐ, त्रिशुल अशी शुभचिन्हे अंकित असतात अशी किंवदंती आहे.ड्युप्लिकेट रुद्राक्षांवर या प्रतिमा कोरण्याचे प्रकारही मी बघितले आहेत. माझ्या पुजेतील इंडोनेशिअन एकमुखी रुद्राक्षावर एक अस्सल शिवलिंग प्रतिमा आहे (अर्थात प्रत्येक रुद्राक्षावर ती असतेच असे नाही) शिवभक्तांनी इंडोनेशिअन एकमुखी रुद्राक्ष धारण करणे केव्हाही उत्तम. इंडोनेशिअन एकमुखी रुद्राक्ष हा काजू किंवा संत्र्याच्या फोडीच्या आकाराचा, पांढरट पिवळसर ते लालसर काळ्या रंगात उपलब्ध्द असतो. तो अतिशय रेखीव, सुबक व देखणा असतो.
एकमुखी रुद्राक्ष हा प्रामुख्याने दारिद्र्यनाशक, क्लेशनाशक आणि लक्ष्मीकारक म्हणून प्रचलित आहे. तो अत्यंत पवित्र, श्रेष्ठ व दैदिप्यमान असतो. एकमुखी रुद्राक्षातून प्रस्फुरित होणारी स्पंदने व लहरी या अतिशय तीव्र स्वरुपाच्या असून आध्यात्मिक प्रगती करणाऱ्या, धारणकर्त्याच्या मनात शुभत्व निर्माण करणाऱ्या, पवित्र असतात, त्यामुळे संस्कारीत एकमुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तिच्या आसपास वाईट व अशुभ शक्ती चूकुनही फिरकत नाहीत किंवा अशा अशुभ स्पंदनांचा त्रास त्यांना होत नाही. एकमुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तिच्या शुभप्रभावाने त्याचा शत्रुपक्ष कमकुवत होतो, शत्रुत्वाची धार कमी होते व एकेदिवशी मनुष्य अजातशत्रु बनतो असा अनुभव अनेकांना आला आहे, त्यामुळे ज्यांना तीव्र व्यावसायिक व वैयक्तिक शत्रुत्वाचा त्रास आहे, स्पर्धक बलवान आहेत अशांना मी एकमुखी रुद्राक्ष वापरण्याचा सल्ला आवर्जुन देतो. आम्ही एकमुखी रुद्राक्षावर एका विशिष्ट पध्दतीने शंकराच्या दारिद्र्यदहनत्वाचे संस्कार करत असल्याने एकमुखी रुद्राक्षामधील मुळात असलेली दारिद्र्यनाशशक्ती खुप वाढते, व्यक्ती कर्जमुक्त व्हायला सुरुवात होते, धनप्राप्तीचे अनेक मार्ग मोकळे व्हायला लागतात, येणी असल्यास ती वसुल व्हायला सुरुवात होते. पैसा अवास्तव खर्च होत असेल तर त्यालाही आळा बसतो…नोकरी व्यावसायातील आर्थिक उत्पन्न वाढीस लागते. धनसंचय व्हायला लागतो. असे असंख्य शब्दातीत फायदे व लाभ एकमुखी रुद्राक्षधारणाने व्हायला लागतात.
एकमुखी रुद्राक्षाचे पेंडंट गळ्यातून काढून उजव्या मुठीत ठेवून पंधरा मिनिटे नुसता ॐ नम: शिवाय असा मंत्रजप केला तरी मानसिक तणावातुन मुक्तता मिळते असा माझ्या अनेक क्लायंट्सचा रोकडा अनुभव आहे. ज्वरविकार, क्षय, विषमज्वर, त्वचारोग यासाठी एकमुखी रुद्राक्ष जर चांदीच्या किंवा स्वच्छ तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून त्यात रात्रभर बुडवून ठेवून ते पाणी सकाळी (रुद्राक्ष बाजुला काढून, गाळून मग) रोग्याला पाजल्यास बऱ्याच अंशी लाभ होतो. रक्तदाब, क्षय, अपस्मार (फीट्स), दुर्धर त्वचाविकार, स्मरणशक्ती कमी असणाऱ्यांनी, अशक्त मनुष्यांनी जर सिध्द एकमुखी रुद्राक्षाचे पेंडंट गळ्यात धारण केले तर खुप फायदा होतो. एकमुखी रुद्राक्ष हा अतिशय पवित्र व कल्पवृक्षासमान असल्याने त्याच्या धारणानंतर परस्त्रीगमन, मद्यपान व जुगार या गोष्टींपासून लांब रहावे लागते (हा नियम कटाक्षाने पाळावाच लागतो), मांसाहार करताना एकमुखी रुद्राक्ष किमान गळ्यात तरी नसावा ही विनंती. आम्ही एकमुखी रुद्राक्ष हा शिवयामल तंत्रातील काही गुढ मंत्र व मानसशक्तींनी सिध्द करुन देत असतो, त्यामुळे अस्सल सर्टिफाईड रुद्राक्ष मिळवून त्यावरील संस्कार यासाठी किमान महिनाभराचा अवधी लागतो हे साधकांनी ध्यानात घ्यावे. सध्या माझ्याकडॆ काही उत्तम एकमुखी रुद्राक्ष उपलब्ध असल्याने ज्यांना एकमुखी रुद्राक्ष धारणात रस आहे अशांनी त्वरित संपर्क साधावा ही विनंती.
#दोनमुखी_रुद्राक्ष
दोन मुखी रुद्राक्षाला शिवपार्वतीस्वरुप मानले जाते. ज्या जोडप्यांना किंवा व्यक्तिंना गौरीशंकर रुद्राक्ष घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही अशांना दोनमुखी रुद्राक्ष दिला जातो. शरीरात जे अवयव समांतर किंवा दुहेरी आहेत अशा अवयवांच्या विकारांवर म्हणजे कान, डोळे, हात-पाय यांच्या विकारांवर दोनमुखी रुद्राक्ष अतिशय प्रभावी उपचार म्हणून धारण केला जातो. दोनमुखी रुद्राक्ष हा समृध्दीकारक, यशकारक व प्रभावी असतो. एकापेक्षा अनेक उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध्द करणे, यश, आध्यात्मिक प्रगती, लाभ, योगसाधनेत प्रगती, मन:शांती यासाठी दोनमुखी रुद्राक्ष काम करतो. शिव आणि शक्ति उपासनेत या रुद्राक्ष धारणेने प्रगती होते. वृषभ व कर्क राशीसाठी हा रुद्राक्ष लाभदायक असतो….
🔹तीनमुखी रुद्राक्ष.
अग्नीरूपात असलेला हा रुद्राक्ष धारण केल्यास कोणताही विकार होत नाही असे म्हणतात.
#चारमुखी_रुद्राक्ष
चारमुखी रुद्राक्ष हा रुद्राक्षांतील “ब्रह्मदेव” मानला जातो. चतुर्मुख ब्रह्मदेवांचे प्रतिक असलेला हा रुद्राक्ष अतिशय पवित्र असतो. या रुद्राक्ष चार पुरुषार्थांचे म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाचेही प्रतिक आहे. यशप्राप्तीसाठी हा रुद्राक्ष अनमोल आहे. ज्या व्यक्ति सेल्स-मार्केटिंग क्षेत्रात काम करतात अशांना हा रुद्राक्ष वरदानस्वरुप असतो. हा चार दिशांवर काम करत असल्याने प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतात. येणाऱ्या ऑर्डर्समध्ये वाढ होते असा अनुभव अनेकांना आहे. ब्रह्मदेव हा सृष्टीचा निर्माता असल्याने विशेषत: संततीप्राप्तीसंदर्भात काही अडचणी असतील तर त्यांची तीव्रता कमी होते व संततीप्राप्तिचे मार्ग सुलभ होतात असा अनेकांचा अनुभव आहे. जी मंडळी सातत्याने बुध्दीसंदर्भात क्षेत्रात काम करतात, शिक्षकवर्ग-वकील-सीए- फायनान्स कन्सल्टंट्स- सरकारी उच्चपदस्थ अधिकारी वगैरेंना या रुद्राक्षाचे खुप लाभ होतात….
#पाचमुखी_रुद्राक्ष
अत्यंत सुपरिचित असा हा रुद्राक्षांतील पंचमुखी (पाचमुखी रुद्राक्ष) आहे. हा तसा खुपच स्वस्त, सर्वत्र उपलब्ध्द आणि परिचित आहे. रुद्राक्षवृक्षाला तुलनेत सर्वाधिक रुद्राक्ष हे पाचमुखीच जास्त येतात. पाचमुखी रुद्राक्षाला “कालाग्नी” ही संज्ञा आहे. पंचमुखी शिवाशी याचा संबंध जोडला जातो.शरिरातील पाच तत्वे, पंचज्ञानेंद्रिये यावर हा रुद्राक्ष जबरदस्त शुभ काम करतो. पंचमुखी रुद्राक्ष सातत्याने प्रदीर्घकाळपर्यंत धारण केल्यास मन:शांती मिळते, मन व बुध्दी स्थिर होते. नाक,कान व घशाचे विकार कमी व्हायला मदत मिळते, रक्तदाबही संतुलित रहातो असे अनेक फायदे या पंचमुखी रुद्राक्ष धारणाने होतात. विशिष्ट मंत्रांनी हा रुद्राक्ष सिध्द करुन वास्तुत ठेवला तरी वास्तुतील जुनाट दोष, मालिन्य व क्लेश कमी व्हायला मदत होते. पंचमुखी रुद्राक्ष गळ्यात धारण केल्यावर मनुष्यातील विवेकशक्ति जागृत होते, वाईट शक्ति, बाधा यापासुन संरक्षण होते. वाहन, वास्तु, शरीर अशा कोणत्याही ठिकाणी जेव्हा हा पंचमुखी रुद्राक्ष असतो तेव्हा त्या क्षेत्रातील बहुसंख्य दोष कमी होऊन ती जागा संरक्षित केली जाते असा अनुभव आहे. अल्पमोली आणि बहुगुणी असा हा पंचमुखी रुद्राक्ष मानला जातो.
#सहामुखी_रुद्राक्ष
रुद्राक्षांमधील सहामुखी रुद्राक्ष देखील अल्पमोली पण अतिशय बलवान व श्रेष्ठ रुद्राक्ष मानला जातो. सहामुखी रुद्राक्ष हा श्रीशिवपुत्र, गणेशभ्राता कार्तिकेय/कार्तिकस्वामींचे प्रतिक मानला जातो. ज्योतिषशास्त्रातील षष्ठस्थान (शत्रुस्थान) हे जेव्हा बिघडलेले असते तेव्हा संबंधित मनुष्याला गुप्तशत्रुंच्या कारवाया, पीडा यांचा जबरदस्त त्रास सहन करावा लागतो,॥ शत्रुबुध्दी विनाशाय ॥ ही उक्ति सहामुखी रुद्राक्षाला अगदी यथार्थपणे लागू होते असं म्हणायला हरकत नाही.
सहामुखी रुद्राक्षधारणानंतर शत्रुंच्या प्रकट व गुप्त कारवाया कमी व्हायला मदत होते. शत्रु नामोहरम व्हायला लागतात. कार्तिकेय ही देवता म्हणजे परमेश्वरी-ईश्वरी सेनेचे सेनापती मानले जातात. अत्यंत बुध्दीमान, चाणाक्ष व जबरदस्त पराक्रमी असे हे दैवत आहे. त्यामुळे सहामुखी रुद्राक्षधारणानंतर हळूहळू व्यवहारज्ञान, चाणाक्षपणा, धोरणीपणा, शौर्य, धाडस व पराक्रम या गुणांचा समुच्चय धारणकर्त्याच्या स्वभावात व्हायला लागतो असा अनुभव आहे. सहामुखी रुद्राक्ष हा व्यक्तिला धाडस, सभाधीटपणा, शौर्य, उत्साह प्रदान करतो.
काम, क्रोध,मद, मोह, लोभ आणि मत्सर हे षडरिपु म्हणून ओळखले जातात. जेव्हा यातील अनेकांचा किंवा एकाचा अतिरेक होतो तेव्हा मानवी स्वभावात खुप मोठे संलग्न दुर्गुण निर्माण व्हायला लागतात, त्यामुळे वैयक्तिक त्याची व समाजाची अधोगती व्हायला सुरुवात होते. या षडरिपुंना संयमित करण्याचे व त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे कार्य सहामुखी रुद्राक्ष करतो. कार्तिकेय ही देवता बुध्दीची देवता मानली जाते. त्यांना विद्यावाचस्पती म्हणतात. त्यामुळे सहामुखी रुद्राक्ष हा विद्यार्थीवर्गालाही अतिशय लाभदायक असतो. स्मरणशक्ति वाढविणे, केलेला अभ्यास लक्षात रहाणे, उत्तम Output देणे, संभाषणकौशल्य यासाठी सहामुखी रुद्राक्ष हा शिवतंत्रातील एक रामबाण उपाय आहे.
कार्तिकेय/कार्तिकस्वामीचे स्त्रीवर्गाशी पटत नसल्याने किंवा तसा पौराणिक संदर्भ असल्याने वैयक्तिक मी स्वत: शक्यतो विवाहित स्त्रीला सहामुखी रुद्राक्ष धारण करावयास सुचवत नाही/देत नाही. मात्र विद्यार्थिनींना हा रुद्राक्ष धारण करावयास कोणतीही हरकत नाही. त्यामुळे लाभच झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत.
#सातमुखी_रुद्राक्ष
सातमुखी रुद्राक्षापासून हळूहळू रुद्राक्षाच्या किंमतीत वाढ व्हायला सुरुवात होते. सात हा आकडा ज्योतिषशास्त्रातील नेपच्युन ग्रहाशी संबंधित असुन सप्तरंग, सप्तमातृका, सप्तस्वर यांचेही प्रतिक आहे. सातमुखी रुद्राक्ष हा स्वभावातील
“आनंद ” (Happiness) या गुणांशी संबंधित आहे असं माझं संशोधन आहे. सातमुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर व्यक्तिमधील निराशा, मरगळ व निरुत्साह संपून एक नवं आनंदपर्व सुरु होते असा अनुभव व निरिक्षण आहे. सातमुखी रुद्राक्षधारणानंतर विनम्रता,औदार्य,क्षमाशीलता,परिश्रम,दया,संयम व पवित्रता या सात सद्गगुणांचाही व्यक्तिमधे समावेश व्हायला लागतो. एकंदरीत दुभंग व निराश व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होते. अतिशय गुढ पण छान अनुभव यायला लागतात, ध्यानधारणेतही मनासारखी प्रगती व्हायला सुरुवात होते.
रुद्राक्ष हा मनावर व शरिरावर एकत्रित परीणाम करतो. सातमुखी रुद्राक्ष हा श्रीलक्ष्मीनारायणांचे प्रतिक मानला जात असल्याने अचल धनसंपत्ती, सुयश, व्यावसायिक यश व सुस्थिरता, पैशाचा अपव्यय थांबणे, येणी वसुल होणे, धंदा-नोकरीसाठी अत्यावश्यक असणारे ज्ञान संपादन करणे, व्यवहारचातुर्य अशा कितीतरी गुणांचा परिपाक व्यक्तिच्या व्यक्तिमत्वात व्हायला सुरुवात होते. संधीवात, हाडांची जुनाट दुखणी, वातविकार यावरही हा रुद्राक्ष उत्तम परिणामकारक ठरतो. शरिरातील “रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र” या सप्तधातूंवरही हा रुद्राक्ष शुभपरिणाम करत असल्याने एकंदरीत Physical metabolism सुधारायला निश्चितच मदत होते. असा हा बहुगुणी सातमुखी रुद्राक्ष आहे.
#आठमुखी_रुद्राक्ष
आठ हा आकडा अंकशास्त्रानुसार शनिच्या अंमलाखाली येतो. आठ या अंकातच धीरोदात्तपणा, चाणाक्षपणा, दूरगामी विचार करुन योजना आखण्याचा संकल्प, प्रदीर्घकाळपर्यंत झगडण्याची इच्छाशक्ती या अनेक उत्तम गोष्टी येतात. तसाच आठमुखी रुद्राक्ष हा विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे प्रतिक मानले जाते, त्यामुळे बुध्दीचा विकास होणे, स्मरण्शक्तित वाढ होणे, ज्ञानसाधनेतील अडथळे दूर होणे, शिक्षण पूर्ण होणे यासाठी धारण करण्याची पध्दत आहे. आठमुखी रुद्राक्ष हा गणेशाबरोबरच अष्टदिशा, अष्टदिक्पाल, अष्टविनायकांचे प्रतिक मानला जातो. अनेक जुन्या जाणकारांच्या मते आठमुखी रुद्राक्षाचा संबंध पत्रिकेतील आत्यंत वाईट व नकारात्मक मानल्या गेलेल्या अष्टमस्थानाशी असल्याने अकालमृत्युसंबंधातील दोषनिवारण होणे, आयुष्यवर्धन होणे, पत्रिकेतील वाईट स्थानांच्या दशांचे दुष्परिणाम कमी होणे यासाठीही आहे. ज्या व्यक्तिंना स्वत:च्या अकाली मृत्युचे भय सतत वाटत असते अशांनी हा रुद्राक्ष अवश्य धारण करावा, जेणेकरुन ते भय कमी होऊन सकारात्मक विचार येतात. आठमुखी रुद्राक्षामुळे वातावरणातील विचित्र, अनाकलनीय अशुभ स्पंदनांचा त्रासही माणसाला होत नाही. करणी, जादूटोणा यांचे भय शिल्लक रहात नाही. व्यक्तिचे मन अतिशय सकारात्मक होते. आठमुखी रुद्राक्ष हा विद्यार्थी, वकिली-अकाऊंट्स-HR क्षेत्रातील मंडळी, उच्चपदस्थ अधिकारी यांना अतिशय लाभदायक आहे. सर्व क्षेत्रातील व्यावसायिक मंडळींनाही तो लाभदायक असतो.
रुद्रतंत्रानुसार सिध्द केलेला आठमुखी रुद्राक्ष स्वच्छ धूवून, रात्री झोपण्यापूर्वी एका चांदीच्या वाटीत (किंवा कोणत्याही) अर्धी वाटी पाण्यात बुडवून ठेवावा. व सकाळी उठल्यानंतर आन्हिके आवरुन, स्नान वगैरे करुन पूर्वाभिमुख बसुन ती वाटी समोर ठेवून रुद्राक्ष बाहेर काढून पुसुन बाजुला ठेवावा, व त्यानंतर “अकालो मृत्युहरणं, सर्वव्याधी विनाशनम, रुद्रपादोदकं तीर्थम जठरे धारयाम्यहम ” या मंत्र म्हणून ते पाणी प्यावे. या उपायामुळे रोगनाश होणे, आयुष्यवर्धन होणे, अकालमृत्युभय नष्ट होणे याला मदत होते.
#नऊमुखी_रुद्राक्ष
नवदूर्गेच्या नवविध रुपांचे प्रतिक असलेला नऊमुखी रुद्राक्ष हा एक श्रेष्ठतम रुद्राक्ष मानला जातो…धैर्य, उच्चपदाधिकार, यशस्विता, धनसंपत्ती व सर्वांगिण लाभासाठी नऊमुखी रुद्राक्ष दिला जातो.शत्रुपीडानाश, आरोग्यप्राप्ती, आयुष्यात मंगलकारक घटना घडणे, आत्मविश्वास येणे, धाडस व धैर्याची प्राप्ती होणे असे अनेक गुणधर्म या रुद्राक्षात आहेत. वैवाहिक जीवनातील गैरसमज दूर होतात असाही अनेकांचा अनुभव आहे. नऊमुखी रुद्राक्ष धारणानंतर पतीपत्निंमधील संबंध सुधारतात, दुरावा कमी होतो. नऊमुखी रुद्राक्ष हा आरोग्यशास्त्रानुसार मस्तकविकार, स्त्रीयांचे मासिक पाळीचे विकार, पित्तविकार, डोकेदुखी यासाठीही एक जोड-उपचारपध्दती म्हणून शरिरावर धारण करण्याची पध्दत आहे.
॥ प्रथमं शैलपुत्रीश्च द्वितियं ब्रह्मचारिणी ।
तृतियं चंद्रघंटेती कुष्मांडेती चतुर्थकम् ।।
पंचमं स्कन्दमातेती षष्ठं कात्यायनिती च ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीती चाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदात्री च नवदूर्गा प्रकिर्तित: ।
रुद्रतंत्रासोबत या मंत्राचे संस्कार करुन जर नऊमुखी रुद्राक्ष शरीरावर धारण केला तर त्याचे अतिशय छान अनुभव येतात. आयुष्यात विजय प्राप्त होणे, मंगलकारक घटना घडणे, विशुध्द आध्यात्मिक अनुभव येणे, पैशाची बाजू सुधारणे, बचतीचे प्रमाण वाढणे, शत्रुपीडांची तीव्रता नष्ट होणे अशा दिव्य अनुभवांसाठी हा नऊमुखी रुद्राक्ष धारण करावा….
#दहामुखी_रुद्राक्ष
दहामुखी रुद्राक्ष हा साक्षात भगवान श्रीविष्णूंचे प्रतिक मानला जातो. भगवान श्रीविष्णूंच्या श्रेष्ठत्व, कौशल्य, शौर्य, सौंदर्य, श्रीमंती व स्थैर्य या गुणांचा समुच्चय हा दहामुखी रुद्राक्षाच्या ठायी असल्याने दहामुखी रुद्राक्ष धारण करणारी व्यक्ति साक्षात श्रीविष्णूस्वरुपच बनते. दहामुखी रुद्राक्षधारणानंतर व्यक्तिंच्या आयुष्यातील ससेहोलपट कमी होऊन जीवनाला एकप्रकारची सुस्थिरता व शांतता लाभते असा अनुभव आहे. परिस्थितीशी झगडा कमी होतो.
॥ श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाभिधाच्छ्रोभमानं महीयते।
धान्य धनं पशु बहु पुत्रलाभम् सत्संवत्सरं दीर्घमायुः॥
-दहामुखी रुद्राक्ष धारणाने अचल संपत्ती, मानसन्मान, आयुरारोग्य, सौंदर्य, धान्य, धन, पशु, संतती आणि दीर्घायुष्य या गोष्टींची प्राप्ती व्हायला मदत होते. अनेक उद्योगव्यवसाय करुनही ज्यांना सतत अपयशांचा सामना करावा लागतो, पदरी हार व निराशा येते अशांना उद्योगशीलतेसोबत यशप्राप्तीसाठी हा दहामुखी रुद्राक्ष अतीव सहाय्यक ठरतो असा अनुभव आहे. तो श्रीविष्णूंचे प्रतिक मानला गेलेला असल्यामुळे “जिथे श्रीविष्णू तिथे श्रीलक्ष्मी” या उक्तिनुसार आलेल्या धनसंपत्तीची चंचलता होऊन पैसा स्थिर होऊन टिकायला व पैशाची बचत किंवा नियोजन व्हायला अतिशय मदत होते. घरातील अनावश्यक खर्च कमी होतात. असा हा अतिशय दिव्य आणि कामधेनुस्वरुप दहामुखी रुद्राक्ष खुपच श्रेष्ठ व पवित्र मानला जातो.
#अकरामुखी_रुद्राक्ष
अकरामुखी रुद्राक्ष म्हणजे शिवभक्तांचा प्राण मानला जातो. वीरभद्र, शंभु, गिरिश, अजैकपाद, अहिर्बुध्न्य, पिनाकी, अपराजित,भुवनाधिश्वर, कपाली, स्थाणू आणि भव हे अकरा रुद्र मानले जातात. अकरा ही संख्या पवित्र मानली जाते. अंकशास्त्रातील ११ हा आकडा शुभ मानतात. पहिली समरुप (दोन्ही एकक अंक समान असलेली संख्या) म्हणजे अकरा हीच आहे. अकरामुखी किंवा एकादशमुखी रुद्राक्ष हा साक्षात रुद्ररुप असल्याने संकटांचा समुळ नाश करुन धारणकर्त्याला सर्व प्रकारची सुरक्षितता व सुयश देणारा असा मानला जातो. अकालमृत्युहरण, सर्वकामदाफलदायक अशा अनेक संज्ञा या रुद्राक्षाला दिल्या आहेत. माझ्या परिचयातील एका अतिशय श्रीमंत कुटुंबात (या कुटुंबातील मागच्या तिन्ही पिढ्या रुढार्थाने श्रीमंत व प्रत्येक व्यक्ती दीर्घायुष्यसंपन्न आहे) एका ऋषीने दिलेला एकादशमुखी रुद्राक्ष पूजेत ठेवलेला आहे. कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी या रुद्राक्षाचे विधीवत पूजन केले जाते. घराण्यातील संपत्ती व दीर्घायुष्याचं श्रेय त्या मंडळींनी या रुद्राक्षालाच दिले आहे. अकरामुखी रुद्राक्ष हा उद्योगशीलता, कार्यप्रवणता, श्रेष्ठत्व, सुयश प्रदान करणारा आहे. प्रचंड धनसंपत्तीप्राप्त झाल्यानंतर व्यक्तिला एकप्रकारची शांतता व तृप्तता लाभायला हवी (खरं म्हणजे तसं होत नाही. व्यक्ति अधिक धावपळ करत अजुन पैशाच्या मागे लागते) ती या रुद्राक्षाने मिळते. संपत्तीचे तेज, स्थैर्य, यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचल्यानंतरच्या विजयाचा आनंद या रुद्राक्षधारणानंतर मिळतो हे नक्की…
आरोग्यशास्त्रानुसार वजन कमी असणे, रोगटपणा, आळस, अतिनिद्रा, शरिराची वाढ न होणे, वाढ खुंटणे, दमा, श्वसनविकार यासाठी हा रुद्राक्ष धारण केला जातो. या रुद्राक्षधारणाने व्यक्तिला एकप्रकारचे तेजतत्व प्राप्त होते.
#बारामुखी_रुद्राक्ष
धातु, मित्र, अर्यमन, रुद्र, वरुण, सूर्य, भग, विवस्वत, पुषन, सवितृ, त्वष्टा आणि विष्णु
ही सूर्याची बारा नावे आहेत. अशा बारा सूर्यांचे तेज ज्याच्यात एकवटले आहे असा बारामुखी रुद्राक्ष हा रुद्राक्षांमधील तेजतत्वाचे, विजयाचे आणि अखंड यशाचे प्रतिक मानला जातो. बारामुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्याचे तेज प्रबळ बनून त्याचा समोरच्या व्यक्तिवर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडतो. सूर्य ज्याप्रमाणे पृथ्वीतलावर समग्र जीवसृष्टीचे भरणपोषण करतो त्याप्रमाणे या व्यक्ति इतरांना सहाय्यक होतात व स्वत:च्या सर्व जबाबदऱ्या यशस्वीपणे पार पाडतात असा अनुभव आहे. हा श्रेष्ठ असा बारामुखी रुद्राक्ष प्रेरणादायक, ध्येयनिष्ठा प्रदान करणारा, धाडस देणारा,आत्मविश्वास व नेतृत्वगुण प्रदान करणारा आहे. व्यापार, देणेघेण्याचे व्यवहार असणारी मंडळी,रिटेल ट्रेडर्स, ट्रान्स्पोर्टर्स यांना हा रुद्राक्ष अतिशय लाभदायक ठरतो. समाजात मानसन्मान, प्रतिष्ठा प्राप्त होते. धनसंपत्तीचे लाभ होतात.
🔹तेरामुखी रुद्राक्ष
याच्या पूजनाने सिद्धी प्राप्त होते.
🔹चौदामुखी रुद्राक्ष
रोगनिवारण होऊन इच्छा पूर्ती होण्यासाठी याची पूजा करतात.