शि भ प रामेश्वर बळीराम आप्पा परभणी यांचे लेखन कार्य सर्व भाविक याना आवडत आहे रामेश्वर आप्पा यांचे मनःपुर्वक अभिनंदन शिरोमणी मन्मथ माऊली लिखित परम रहस्य ग्रंथ रोज निशी करण्याचा अल्प प्रयत्न मी करत आहे. सर्व वाचकांनी आणि भक्तांनी त्याबाबत जरूर प्रतिक्रिया कळवाव्यात.संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलींनी मराठी भाषेत जे ज्ञान आणले आहे ती मराठी भाषा अमृताच्या बरोबरीची व्हावी या उद्देशाने. त्यांचे ज्ञान गंगा या काळाच्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य सर्व शिवाचार्य गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने प्रयत्न करण्याचा संकल्प केला आहे.संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली हे मराठी भक्तिसाहित्यातील महत्त्वाचे संतशिरोमणी आहेत. त्यांनी लिहिलेला परम रहस्य ग्रंथ व अभंग रचना साध्या, सोप्या भाषेत आणि भक्तिभावाने ओतप्रोत आहे. त्यांच्या अभंगांत भक्ती, ज्ञान, शरणागती, वैराग्य आणि सामाजिक सुधारणा यांचे दर्शन होते. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलींची काही निवडक अभंग आहेत अनेक अभंग रचना, इतकच काय तर आचार विचारही मराठीतून सर्वां पर्यंत पोहचवले. महाराष्ट्रातील सर्व शिवाचार्य गुरुमाऊलींनी वीरशैव संत महात्म्यांनी परम रहस्य ग्रंथ ह्या सर्वांचे सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे सर्व उत्कृष्ट कार्य केले आम्ही ऋणी आहोत.महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून वीरशैव संप्रदाय अस्तित्वात आहेत. त्यात वीरशैव, प्रमुख मानले जातात. या वीरशैव संप्रदायांचा महाराष्ट्राची संस्कृती व लोकजीवनावर मोठा प्रभाव दिसून येतो. या वीरशैव संप्रदायांमध्ये मुख्यतः ‘भक्ती’ ही मूळ प्रेरणा असून, ज्याचे महत्त्व व औचित्य आजच्या काळातही कमी झालेले नाही. म्हणूनच, वीरशैव संप्रदाय, त्यांचे तत्त्वज्ञान – विचारधारा, त्यांची संत परंपरा, त्यांनी दाखवलेले मार्ग सर्वांना सहज सोप्या भाषेत उलगडून सांगणारे ग्रंथ वसुंधरारत्न शिवलिंग शिवाचार्य माऊलींनी व शिवाचार्य रत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज ( बाबांनी ) समाजाच्या कल्याणासाठी आथक परिश्रमानंतर प्रकाशित केलेमाणसाला माणूस बनवण्याचे कार्य वीरशैव संतांनी केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी त्यांच्या विचारचा प्रचार व्हावा. समता, बंधुत्व, प्रेम, परस्पर विश्वास आणि गुरूंवरील श्रद्धा ही मूल्ये त्यांनी जोपासली जावी हीच जगद्गुरु पलसिद्ध चरणी प्रार्थना🙏🙏🙏🚩 जाहिरात देण्यासाठी संपर्क शिवराज भोस्कर मो 9158553093
शि भ प रामेश्वर बळीराम आप्पा बरडे परभणी उत्कृष्ट लेखन सोशल मिडीया माध्यमातुन संप्तरत्न गाथा दररोज एक अभंग लिहणे
-
Previous
💐 *लिंगैक्य गुरुवर्यांना भावपूर्ण आदरांजली* 💐😭😭😭😭😭😭 *शिवाचार्यरत्न श्री ष.ब्र.प्र. १०८ सद्गुरू सांब शिवाचार्य महाराज (थोरला मठ संस्थान वसमत)* यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वार्धक्याने आज मंगळवार रोजी पहाटे ०५.४५ वाजता लिंगैक्य झाले.त्यांचा समाधी सोहळा आजच सायंकाळी चार वाजता थोरला मठ संस्थान वसमत येथे होणार आहे. गुरुवर्यांचे चरणी कोटी कोटी सा.दंडवत. ॐ शान्ति शान्ति शान्ति : |🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻