शरण गणमाता अक्का नागाई यांच्या जयंतीनिमित्त छोटासा परिचय. अक्कानागाईचा जन्म विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी येथे शुद्ध सुचीर्भूत महान शिवभक्त शिवसंस्कारी वीरशैव लिंगायत दांपत्य मादिराज व मादलांबिका त्यांच्या पोटी झाला. महात्मा बसवेश्वरांच्या त्या मोठी बहीण होत. महात्मा बसवेश्वरांच्या समग्र समाजक्रांती चळवळीत त्यांचा मोलाचे योगदान आहे.भारताच्या इतिहासात धर्म, साहित्य ,संस्कृती व परंपरांनी व्यापलेला आहे. भारतीय संस्कृतीचे संरक्षण व संवर्धनासाठी पुरुषांबरोबरच असंख्य स्त्रियांनीही अमूल्य योगदान दिले आहे. बलिदान केली आहे. परंतु पुरुषप्रधानत्वाचा अहं बाळगणाऱ्या इतिहासकारांनी स्त्री पराक्रमाचा इतिहास विस्ताराने लिहिला नाही. काही मोजकी नावे सोडली तर इतिहासकालीन अनेक स्त्री रत्ने अनभिज्ञच राहिली आहेत. विशेषत्वाने बाराव्या शतकातील स्त्री चळवळ भारतीय इतिहासकारांनी पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ज्या 12 व्या शतकात बसवयुगात स्त्री स्वतंत्र्याचा उदय झाला. स्त्री पुरुष समान मानले गेले, पुरुषांच्या बरोबरीचे सर्व हक्क स्त्रियांना दिले गेले .धर्म ,साहित्य, शिक्षण, संरक्षण यात उल्लेखनीय कार्य घडले, त्याकाळी वचन साहित्याच्या रक्षणासाठी हाती शस्त्र घेऊन प्रस्थापित व्यवस्थेशी झुंज दिलेल्या आमच्या क्षात्रतेजस्विनी अक्कानागम्मा होत. अक्का नागम्मा ही शरणाच्या मांदियाळीतील एक मातृस्वरूपी शक्ती होती. वचन साहित्याच्या संरक्षणासाठी नागाईने दाखविलेले धैर्य, शौर्य हे तिच्यातील वीरवृत्तीचे दर्शन घडवते. बिज्जळ सैन्याशी लढा देत कल्याण पासून उळवीच्या घनदाट अरण्यापर्यंत केलेला प्रवास चित्त थरारक आहे. लिंगायत धर्मसाहित्य संरक्षणासाठी अक्कानागाईचा त्याग रोमांचकारी आहे. महात्मा बसवेश्वरांच्या जीवनाचा पूर्वार्ध अक्कनागाईच्या प्रेमाने व्यापला आहे. अक्कनागम्माचे वात्सल्य प्रेम मातृस्वरूपी होते आणि महात्मा बसवेश्वर तिला आपला शिशु वाटतात. महात्मा बसवेश्वर विषयी अति प्रेमभाव व्यक्त करताना,’बसवाला जन्म दिलेली बाळंतीन मी ‘असे ते म्हणतात. महात्मा बसेश्वर यांचे मातृत्व आपल्याकडे घेऊन बसव आणि मी दोन नसून एकच आहोत. या अद्वैताचे विशाल दर्शन त्यांच्या वचनातून होते. बिज्जळ सैन्याशी हाती तलवार घेऊन लढलेली रणरागिनी इथे मातृप्रेमाचा वर्षाव करते. महात्मा बसवेश्वर त्यांच्या पोटी जन्माला आले नसले तरी, त्यांच्या विचार गर्भातच महात्मा बसवेश्वर या समता सूर्याचा उदय झाला हे मात्र निश्चित! महात्मा बसवेश्वर यांस प्रेरकशक्ती होऊन अक्कनागम्मा आयुष्यभर सोबत राहिले. महात्मा बसवेश्वरांच्या समग्र जीवन कार्याची एकमेव साक्षीदार म्हणजे अक्कनागाई होय. महात्मा बसवेश्वरांच्या समाज परिवर्तनाच्या कार्यास नागाईची मोलाची साथ मिळाली. अनुभव मंडपात येणाऱ्या शरणींना साक्षर करण्यात नागाईचा सिंहाचा वाटा आहे. शरणींना मातृस्वरूपी होऊन नागाई जगत होती. अशा वीर वीरागिनी शरण गणमाता अक्कनागाई यांना कोटी कोटी प्रणाम…🚩💐💐💐🙏🙏 विनम्र अभिवादन समस्त गावकरी मंडळी बेंद्री ता नायगाव जिल्हा नांदेड मो 9158553093
-
Previous
कुटुंबातील वाढदिवसा निमित्त तुपदाळे कुटुंबाचाअनोखा उपक्रम…..आज पहिल्या श्रावण सोमवार निमित्त राष्ट्रसंत सद्गुरू डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या नावाने सुरू असलेल्या धर्माबाद येथील अनाथाश्रम व गो शाळेला नायगाव येथील तुपदाळे कुटुंबाने भेट देऊन उपस्थित बालकांची भेट घेतली.गो शाळेतील गायाना कुरवाळले,या वेळी अनाथाश्रमाचे प्रमुख शिव कीर्तनकार तथा प्रबोधनकार राष्ट्रसंताचे प्रासादिक शिष्य शि भ प मोहनराव कावडे गुरूजी हसनाळीकर या दाम्पत्यानी उपस्थित मंडळीचा सन्मान केला . यावेळी खुशालराव तुपदाळे,सौ.लक्ष्मीबाई तुपदाळे वन्नाळीकर पाटील, विकास भुरे आदी उपस्थित होते.शिवराज भोस्कर यांच्या कडुन मनःपुर्वक शुभेच्छा 🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐